छत्तीसगडमधील एका विचित्र घटनेत आठ वर्षाच्या मुलाने कोब्रा सापाचा चावा घेतल्यामुळे सापाचा मृत्यू झाला आहे. जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा घातला. त्यानंतर या मुलाने सापापासून सुटका करण्यासाठी सापाचा चावा घेतला. ज्यात सापाचाच मृत्यू झाला.
दिपक असं या मुलाच नाव आहे. दीपक त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. ‘सापाने माझ्या हाताला विळखा मारला आणि हाताचा चावा घेतला. मी हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. म्हणून मी दोन वेळा सापाला चावलो,’ असं दिपकने स्थानिक प्रसारमाध्यमांनासांगितलं आहे.
या घटनेनंतर त्या मुलाला जवळच्या आरोग्य केंद्रावर दाखल करण्यात आलं आहे. त्याला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हते. त्याला साप चावला तरी त्याच्या शरीरामध्ये विष पसरलं नव्हतं. असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं आहे.