न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. रोहितने 47 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत रोहितने 7 चौकार आणि 2 आकाशी षटकार मारले. रोहितची ही अप्रतिम शैली रायपूरच्या क्रिकेट चाहत्यांनी प्रथमच पाहिली कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना येथे खेळला जाणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. यामुळेच संपूर्ण स्टेडियम आपल्या ताऱ्याची झलक पाहण्यासाठी खचाखच भरले होते.
या सामन्यात सुरक्षा आणि ग्राऊंड स्टाफला चकमा देत रोहितचा एक मोठा चाहता मैदानात घुसला आणि रोहितला मिठी मारली. काही वेळातच ग्राउंड स्टाफ मैदानावर पोहोचला आणि रोहितपासून त्याला वेगळं केलं. यावेळी रोहितने मोठे मन दाखवत सुरक्षा रक्षकांना मुलाला सोडण्यास सांगितले.
That Hug🥺. and My Captain Rohit Sharma told the security – “let him go, he’s a kid”. The most humble cricket ever @ImRo45 🐐❤
pic.twitter.com/WZ3SQHh7NW— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) January 21, 2023
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोहितबद्दल चाहत्यांमध्ये एवढी क्रेझ पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा लाइव्ह सामन्यादरम्यान चाहते आपल्या स्टार खेळाडूला भेटण्यासाठी मैदानात घुसले आहेत.
जगातील सर्वात चांगली नोकरी; 23 जानेवारीपर्यंत फॉर्म भरा, पगार 40 लाख रुपये दरमहा