मुलीला मारहाण करून तिला जबरदस्तीनं गाडीत बसवलं, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

देशाची राजधानी दिल्लीतून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आधी एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने मारहाण करून तिला कारमध्ये बसवल्याचे दिसत आहे. ही घटना दिल्लीच्या मंगोलपुरी फ्लायओव्हरची आहे, जिथे एका व्यक्तीने फ्लायओव्हरवर एका महिलेला मारहाण केली आणि नंतर तिला कारमध्ये बसवण्यास भाग पाडले. ही कार गुरुग्रामच्या रतन विहारची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी वाहन व चालकाचा शोध घेतला आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले काय आहे प्रकरण-

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसलेल्या मुलीला कसे ओढत आणि मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओची तपासणी केल्यानंतर हा व्हिडीओ राजधानी दिल्लीच्या बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले आणि एका मुलीने उबेर अॅपद्वारे कॅब बुक केली होती. उबेर टॅक्सी रोहिणी ते विकासपुरी बुक केली होती. टॅक्सी चालक मुलगा आणि मुलगी या दोघांना घेऊन विकासपुरीकडे जात असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादानंतर मुलगी कारमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना टॅक्सीतील एका मुलाने तिला जबरदस्तीने कारमध्ये ढकलले.

या व्हिडीओमध्ये वाहनाची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओची दखल घेत दिल्ली पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणारे वाहन आणि त्याच्या चालकाची ओळख पटवली असून पुढील तपास सुरू आहे.