
पनवेल : नवी मुंबईमधील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये (dental college in Navi Mumbai) रॅगिंगचा (raging ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांला दारू पाजली आणि त्यानंतर पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर ज्युनिअरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, चौघांनी 19 वर्षीय तरुणाला दारू प्यायला लावले आणि त्याच्या पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला. महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर घटना जुलैमध्ये घडली होती. परंतु पीडित मुलाने दोन दिवसांपूर्वी आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना दिली. आणि त्यानानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती.