भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 500 कंडोम सापडले, 73 जणांना अटक

WhatsApp Group

शिलाँग : भाजपचे उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी छापेमारी करून सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांना दारूच्या जवळपास 400 बाटल्या आणि 500 हून अधिक कंडोम सापडले आहेत. मेघालयमधील तुरा येथे सेक्स रॅकेट चालवलं जातं होतं. पोलिसांकडून कारवाईच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

मरक यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी सहा अल्पवयीन बालकं (चार मुलं आणि दोन मुली) आढळून आली, अशी माहिती पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी दिली आहे. रिंपू बागान नावाच्या फार्म हाऊसवर अल्पयवीन मुलांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. बर्नार्ड मरक आणि त्यांचे सहकारी या ठिकाणाहून सेक्स रॅकेट चालवत असायचे.

फार्महाऊसवरून सुटका करण्यात आलेल्या बालकांचा ताबा जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. पोलिसांना छापेमारीदरम्यान दारुच्या 400 बाटल्या आणि 500 हून अधिक कंडोम सापडले. या ठिकाणाहून 73 जणांना अटक करण्यात आली आहे.