अफगाणिस्तानातील शाळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. काबूलमधील शाळांमध्ये मंगळवारी सकाळी तीन स्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुले शाळेबाहेर उभी असताना हा स्फोट झाला.
पहिला स्फोट राजधानीच्या मुमताज शैक्षणिक केंद्राजवळ झाला. हे स्फोट 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने झाले. यानंतर काही वेळातच अब्दुरहिम शाहिद हायस्कूलमध्ये मुले वर्गातून बाहेर पडत असताना दुसरा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा मुले शाळेतून बाहेर पडत होती.
अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही अंशी शांततेची होत असताना आता पुन्हा एकदा या घटनेमुळे काबूल शहर हादरले आहे. शिया समुदायाला लक्ष करत आत्मघातकी हल्लेखोरांकडून हे स्फोट करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.