कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या पोस्टरसमोर सिगारेट ओढत पोरींचा धिंगाणा! व्हिडीओ व्हायरल

WhatsApp Group

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज (Shivaji Maharaj And Shahu Maharaj ) यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत मुलींनी धिंगाणा घातल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे (Kolhapur Viral Video) प्रचंड संतपा व्यक्त करण्यात येत आहे. डॉल्बीच्या तालावर सिगरेट ओढत, नशापान करत मुली थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.

कोल्हापुरातील हा प्रकार असून या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिव-शाहू प्रेमींमध्ये या व्हिडीओविरोधात संतापाची भावना उसळली आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले लक्ष्मीपुरी पोलिस (Kolhapur Police) ठाण्यामध्ये या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मुलींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक डीजे लावण्यात आला असून या मुली डांस करताना दिसत आहेत. या डीजेच्या स्पीकरवर पंचगंगा तालीम असं लिहिण्यात आलं. त्याच पोस्टरवर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो आहे. डीजेवर प्रसिद्ध चंद्रमुखी या गाण्याचं रिमिक्स सुरु आहे. मोठ्या प्रमाणात डीजेच्या स्पीकरसमोर गर्दी आहे. तरुण तरुणीच्या डीजेच्या तालावर थिरकत आहेत. अशातच काही मुली या चक्क सिगरेट ओढत आहेत. कोल्हापूरमधील व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ग्रूपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.