श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी देशभरात आनंदाचे आणि उत्सुवाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही हा सोहळा जोरात साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना या आंनदोत्सवात सहभागी होता यावे,यासाठी महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे. pic.twitter.com/tJPJYj6f8n
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 19, 2024