
Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा शहरामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. शहादा बायपास रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरा-समोर (Accident) धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही भीषण घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा