कैद्याने गिळला मोबाईल, पोटात दुखू लागल्याने सत्य आलं बाहेर

WhatsApp Group

गोपालगंज : बिहारमधील गोपालगंजमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे एका कैद्याने घाबरून मोबाईल गिळला. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोपालगंज जिल्हा कारागृहातील एका कैद्याने तपासादरम्यान कारागृह अधिकाऱ्यांकडून पकडले जाण्याच्या भीतीने मोबाईल गिळला. मात्र, हे तेव्हाच कळू शकले, जेव्हा कैसर अलीच्या पोटात प्रचंड दुखत होते. गोपालगंज तुरुंगाचे अधीक्षक मनोज कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, “कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि संपूर्ण घटना सांगितली.

रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डचे डॉक्टर सलाम सिद्दीकी म्हणाले, “कैद्याला पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्याच्या पोटाचा एक्स-रे घेण्यात आला आणि त्याची कसून तपासणी करण्यासाठी रुग्णालयाकडून वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. कैद्याला पुढील उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. अलीला गोपाळगंज पोलिसांनी 17 जानेवारी 2020 रोजी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (एनडीपीएस ऍक्ट) च्या तरतुदींनुसार अटक केली होती आणि तो तीन वर्षे तुरुंगवास भोगत आहे.

बिहार तुरुंगात कैद्यांकडून मोबाईल फोन वापरल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च 2021 मध्ये राज्यभरातील कारागृहांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 35 सेलफोन, सात सिमकार्ड आणि 17 सेलफोन चार्जरही जप्त करण्यात आले होते. कटिहार, बक्सर, गोपालगंज, नालंदा, हाजीपूर, आराह, जेहानाबाद आणि राज्यातील काही तुरुंगांमध्ये हे छापे टाकण्यात आले.