नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. त्यावर आमदारांनी जोरदार चर्चा केली, मात्र याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
रस्त्याअभावी महिलेला झोळीतून साडे तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुले महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.