शर्टच्या आत घुसला विषारी साप, मग काय झालं…पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

सापाचे नाव ऐकताच मनात थरकाप उडतो. पण जर एखाद्याच्या शर्टमध्ये साप घुसला तर काय होईल याची कल्पना करा. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाच्या शर्टमध्ये मोठा साप केव्हा घुसला हे त्याला समजलेच नाही.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. तो एका झाडाला टेकून बसला आहे आणि आजूबाजूला येणाऱ्या आवाजांवरून त्याच्या शर्टमध्ये साप असल्याचे दिसून येते. ती व्यक्ती खूप घाबरलेली आहे आणि त्याच्या शर्टच्या आतून सापाच्या फुशारक्याचा आवाजही येत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वारंवार त्याला हलवू नका, आवाज करू नका असे सांगत आहेत. त्यांनी त्याच्या शर्टचे बटण उघडले आणि तेवढ्यात एक मोठा साप दिसला.

Viral Video: सापाला पाहून त्या तरुणाची प्रकृती बिघडली.. तो आपल्या शर्टात कसा आला हे त्यालाच कळत नाही. आजूबाजूचे लोक शर्टाचे बटण उघडतात तेव्हा सापाला बाहेर येण्याची जागा मिळते आणि तो हळूच त्या व्यक्तीच्या पाठीवरून बाहेर पडतो. साप बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या व्यक्तीने सांगितले की, जेवल्यानंतर तो काही वेळ आराम करण्यासाठी झाडाखाली बसला होता आणि या दरम्यान साप त्याच्या शर्टच्या आत केव्हा गेला ते कळलेच नाही. हा व्हिडिओ आयपीएस रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला असून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे.

पहा व्हिडिओ