थरकाप उडवणारा Video! लाईव्ह सामन्यात अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू

0
WhatsApp Group

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे नक्कीच तुमचा थरकाप उडेल. यामध्ये फुटबॉलच्या Live सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातल्या बान्डुंगमध्ये फुटबॉलचा हा सामना सुरु होता. ही संपूर्ण दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

एका एक्स युजरने या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान एका व्यक्तीवर वीज कोसळली. या क्लिपमध्ये खेळाडू मैदानात उभा असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. यानंतर लगेच तो जमिनीवर कोसळला. इतर खेळाडू त्याच्या मदतीसाठी धावतात, असे या व्हिडिओत दिसत आहे.

ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. हा सामना खेळताना पाऊस सुरू होता. त्यावेळी वीज खेळाडूच्या अंगावर कोसळली. यानंतर इतर खेळाडूंनी त्याला उपचारासाठी सरिनिंगसिह रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारपूर्वीच त्याला मृत घोषित केले.