धक्कादायक! Spain वरून आलेल्या व्यक्तीला एकाच वेळी Monkeypox, COVID-19 आणि HIV ची लागण

WhatsApp Group

स्पेन (Spain) मध्ये 5 दिवसांची ट्रीप करून इटलीत परतलेल्या एका व्यक्तीला एकाच वेळी Monkeypox, COVID-19 आणि HIV ची लागण झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 36 वर्षीय इटलीच्या या व्यक्तीला परतल्यानंतर 9 दिवसांनी ताप, घशात खवखव, थकवा, डोकेदुखी, Groin च्या भागात दाह अशी लक्षणं आढळून आली. दरम्यान ही पहिलीच घटना आहे जेथे तिन्ही आजार एका व्यक्तीला एकाच वेळी झाल्याचं समोर आलं आहे.

Journal of Infection मध्ये दिलेल्या माहितीनुसार, लक्षणं दिसू लागल्यानंतर 3 दिवसांनी त्याची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली. या व्यक्तीला जानेवारी महिन्यात कोविड 19ची लस घेतल्यानंतर काही दिवसांतच कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांतच त्याच्या हातावर रॅशेस दिसायला लागले. ब्लिस्टर्स पसरले. यानंतर डॉक्टरांनी त्याला तातडीने Sicily’s east coastच्या Catania मधील हॉस्पिटल मध्ये इमरजन्सी रूम मध्ये ठेवले.

हॉस्पिटल मध्ये चाचणी केल्यानंतर एकापाठोपाठ एक Monkeypox, COVID-19 आणि HIVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एचआयव्ही टेस्ट मध्ये हाय वायरल लोड दाखवण्यात आला आहे. आठवडाभराच्या उपचारानंतर हॉस्पिटल मधून रूग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. कोविड 19 आणि मंकिपॉक्स मधून तो बाहेर पडला आहे. मात्र शरीरावर काही व्रण राहिले आहेत.