
Nepal Plane Crash: 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. आता या अपघातग्रस्त विमानाचे फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागामधील कोबानमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे तुकडे झाले. दरम्यान, रेस्क्यू टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू जाला आहे.
या विमानामध्ये 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. भारतीयांमध्ये ठाण्याच्या चौघांचा समावेश आहे. या विमानाने पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्याच्या 15 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला.
त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली. स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहे.