त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दख़ल घेतली जाईल. पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे.