Viral Video: आशा भोसले यांच्या गाण्यावर नेपाळी मुलग्याने केला जबरदस्त डांस, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

Viral Video: बॉलीवूड चित्रपट आणि गाणी केवळ भारतातच नाही तर सीमेपलीकडील देशांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांची स्वतःची वेगळी फॅन फॉलोइंग आहे. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये परदेशी लोक बॉलीवूड गाण्यांवर नाचताना, गाताना किंवा लिप सिंक करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये गौरव नावाचा नेपाळी तरुण 2002 मध्ये आलेल्या ‘मेरे यार की शादी है’ या बॉलिवूड चित्रपटातील शरारा या आयटम साँगवर डान्स करताना दिसत आहे. या नेपाळीचे किलर एक्स्प्रेशन्स आणि एनर्जी तुम्हालाही डान्स करायला लावू शकते. हा डान्स व्हिडिओ यूजर्सना खूप आवडला असून तो व्हायरलही होत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ 6 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा व्हिडिओ 2.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेपाळी मुलाच्या या डान्स व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा महापूर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आशा भोसले यांनी गायलेल्या शरारा या गाण्यावर हा नेपाळी मुलगा डान्स करत असून, या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Little Girls Dance: ‘मेरे सपनो की रानी’ गाण्यावर चिमुरडीचा जबरदस्त डान्स, Video होतोय व्हायरल