अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राझदानचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. आलियाचे आजोबा अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. आलियाने या पोस्टमध्ये एक क्यूट व्हिडिओही शेअर केला आहे, जो खूपच भावूक झाला आहे.
आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती नानांचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या 93 व्या वाढदिवसाचा आहे. आलिया भट्टची पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझे आजोबा, माझे हिरो. 93 वर्षांपर्यंत गोल्फ खेळले. 93 वर्षांपर्यंत त्यांनी काम केलं. ते सर्वोत्कृष्ट ऑमलेट बनवायचे, सर्वोत्कृष्ट कथा सांगायचे. त्यांनी वायोलिन वाजवलंय, त्यांच्या पणतीसोबत ते खेळले. त्यांना क्रिकेट, स्केचिंग आणि कुटुंब खूप आवडायचं. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आयुष्यावर भरभरून प्रेम केलं. माझं हृदय दु:खाने आणि तितकंच आनंदाने भरलंय. कारण माझ्या आजोबांनी आम्हाला फक्त आनंदच दिला. त्यासाटी मी स्वत:ला खूप नशिबवान मानते’, अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.
आलियाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांनी गुरुवारी, 1 जून 2023 रोजी अखेरचा श्वास घेतला. ते काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती. याच कारणामुळे आलिया दुबईत आयोजित आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही.
आलियाप्रमाणेच सोनी राजदाननेही एका पोस्टद्वारे तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘तुम्ही आमच्या हृदयाचा एक तुकडा तुमच्यासोबत घेऊन गेलात, पण आम्ही तुमच्या आत्म्यापासून कधीच दूर जाणार नाही. तुम्ही सतत आमच्यात राहाल आणि जीवंत असण्याचा खरा अर्थ काय याची आठवण आम्हाला करून द्याल. तुम्ही जिथे कुठे असाल, ते ठिकाण आता तुमच्यामुळे अत्यंत आनंदी ठिकाण असेल,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
View this post on Instagram