
अहमदाबादच्या शाहीबाग परिसरात एका इमारतीच्या 7व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला असून अनेक लोक अडकले आहेत. यादरम्यान अनेक लोक जीव वाचवण्याची याचना करताना दिसले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुलगी घरी एकटी होती
आगीमुळे 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील इतर सदस्य घरी उपस्थित नव्हते. आग कशामुळे लागली हे देखील स्पष्ट झालेले नाही. काही लोक वरच्या मजल्यावर अडकले आहेत. भीषण आगीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
At Ahmedabad’s Shahibaug area, a fire broke out in the Green Orchid building. The situation is under control. All trapped people have been rescued.#Ahmedabad #Gujarat #VibesofIndia pic.twitter.com/3zTjMzDwdF
— Vibes of India (@vibesofindia_) January 7, 2023
अग्निशमन दलाच्या पथकाने दोरीच्या साहाय्याने आठव्या मजल्यावर पोहोचून सातव्या मजल्यावर पोहोचून दरवाजा तोडून अल्पवयीन मुलाला बाहेर काढले. अल्पवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती गंभीर भाजल्यामुळे तीचा मृत्यू झाला. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.