दिल्लीतील शास्त्रीनगर येथील चार मजली इमारतीला भीषण आग, 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

दिल्लीतील शाहदरा येथील शास्त्री नगर भागात असलेल्या एका निवासी इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे पार्किंगमध्ये उभी असलेली चार वाहने जळून खाक झाली. पोलिसांनी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले.

शास्त्रीनगर भागातील गल्ली क्रमांक 13 मधील घर क्रमांक 65 मध्ये आग लागली. ही चार मजली असलेली निवासी इमारत आहे. यासोबत तळमजला आणि पार्किंग देखील आहे. पार्किंगमधून लागलेली आग संपूर्ण इमारतीत पसरली आणि इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले. रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यात खूप अडचणी आल्या.

अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला पहाटे 5.20 च्या सुमारास गीता कॉलनीजवळील शास्त्री नगरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने दिल्ली अग्निशमन सेवेला कळवले. घटनास्थळी पोलिसांचे एक पथक, चार फायर इंजिन, ॲम्ब्युलन्स आणि पीसीआर व्हॅन पाठवण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, ज्या इमारतीला आग लागली ती चार मजली असून तळमजल्यावर कार पार्किंग आहे. पार्किंगमधून आग लागली आणि धूर संपूर्ण इमारतीत पसरल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांमध्ये 3 वर्षांची मुलगी आणि 5 महिन्यांच्या बाळाचा समावेश 
“रस्ता अरुंद असूनही, अग्निशमन अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यात यश आले,” अधिकारी म्हणाला. प्रत्येक मजल्याची झडती घेण्यात आली. तेथून तीन पुरुष, चार महिला आणि दोन मुलांना बाहेर काढून हेडगेवार रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये 30 वर्षीय मनोज, 28 वर्षीय महिला सुमन, 3 वर्षांची मुलगी आणि 6 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.