
अमेरिकेतील टेक्सासमधील (America Texas) रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका माथेफिरुने अंदाधुद गोळीबार (Firing in School) केला. यात शाळेतील 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असल्याची माहिती, टेक्सासच्या राज्यपालांकडून देण्यात आली आहे. हल्लेखोर 18 वर्षीय असून त्याने या हल्लानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजते. सल्वाडोर रामोस अशी हल्लाखोराची ओळख पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एक माथेफिरू अचानक घुसला आणि त्याने अंदाधुद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू झाला. 3 शिक्षकांना देखील या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये उपचार दिले जातायत. मुलांच्या पालकांना स्कूल कॅम्पसमध्ये न जाण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.