LPG Price Hike: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, गॅस सिलिंडर महागला

WhatsApp Group

नवीन वर्षाची सुरुवात महागाईच्या धक्क्याने झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर 2023 च्या पहिल्याच दिवशी महाग झाला आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि घरगुती सिलिंडर त्यांच्या सध्याच्या किमतीत विकले जातील.

लपीजी सिलिंडरच्या नवीन किंमतींचा थेट तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होणार नाही, परंतु रेस्टॉरंट्स, हॉटेल्स इत्यादीमधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात कारण व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. गॅसचे हे नवे दरही आजपासून लागू झाले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरचे दर

दिल्ली – 1769
मुंबई – 1721
कोलकाता – 1870
चेन्नई – 1917

घरगुती सिलिंडरचे दर

दिल्ली – 1053
मुंबई – 1052.5
कोलकाता – 1079
चेन्नई – 1068.5

गेल्या वर्षभरात सिलिंडर 153.5 रुपयांनी महागला

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतील शेवटचा बदल म्हणजे 14.2 किलो सिलेंडर 6 जुलै 2022 रोजी करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 153.5 रुपयांनी वाढल्या आहेत.

2022 मध्ये मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. नंतर मे महिन्यात पुन्हा भावात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्याचवेळी मे महिन्यात दुसऱ्यांदा 3.50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये शेवटच्या वेळी दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.