
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशभरात ‘हर घर तिरंगा’ उत्सव सुरू झाला असून तो 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या पर्वात आता केंद्र सरकारने लोकांना या स्वातंत्र्याच्या सणाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे.
याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. अश्या स्थळांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.