मुंबई -अहमदाबाद महामार्गावर टेम्पो – कारचा मोठा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

WhatsApp Group

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार टेम्पोवर धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडला.

भरधाव क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली . हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील काही फोटो समोर आले असून या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसत आहे.