‘मेरा दिल ये पुकारे आजा’ गाण्यावर चिमुरडीने केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

बॉलीवूडमध्ये अशी अनेक जुनी गाणी आहेत, जी लोक जवळजवळ विसरले आहेत, परंतु सोशल मीडिया आल्यापासून ती गाणी पुन्हा लोकांच्या ओठावर येऊ लागली आहेत. आता लता मंगेशकरांनी गायलेले ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणेच घ्या. सध्या हे गाणे सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. खरं तर, अलीकडेच एका पाकिस्तानी मुलगी आयशाने एका लग्नाच्या कार्यक्रमात या गाण्यावर नृत्य करून खळबळ उडवून दिली आणि रातोरात स्टार बनली आणि आता एका चिमुरडीने या गाण्यावर नृत्य करून खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे या मुलीचा हा डान्स व्हिडिओ भारत किंवा पाकिस्तानचा नसून फ्रान्सचा आहे.

मुलीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला लोक पसंतही करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्रान्समधील एका रस्त्यावर मुलगी कशी नाचत आहे. ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे आणि ती मुलगी आयशाने अगदी तशाच पद्धतीने त्यावर नाचत आहे. ती फक्त डान्सच उत्तम करत नाहीये तर तिने इतके अप्रतिम एक्सप्रेशन्स देखील देत आहे. तिने पाकिस्तानी व्हायरल गर्लचे डान्स स्टेप फॉलो केले आहे. या मुलीचे नाव रैना असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणीचा हा डान्स पाहून इंटरनेटवरील लोकही तिचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raena🦋 (@raena_rockstar)

मुलीचा हा अप्रतिम डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर raena_rockstar नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, हा आयडी बहुधा त्याच मुलीचा असावा, कारण त्यावर तिचे इतरही अनेक व्हिडिओ आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा