मणीपुरमध्ये झालेल्या भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

WhatsApp Group

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुवाहाटीतील लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितलं की, अद्याप 38 लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथकं तैनात करण्यात आली आहेत.

लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे.