मुलीचा अश्लिल व्हिडीओ केला व्हायरल; तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या जवानाची हत्या, सात जणांना अटक

WhatsApp Group

गुजरातमधील नडियाद जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बीएसएफ जवानाला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतक शनिवारी चकलासी गावात एका 15 वर्षीय मुलाच्या घरी गेला होता ज्याने कथितरित्या व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता. मुलाच्या कुटुंबीयांनी जवानावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी ट्विट केले आहे.

हत्येच्या आरोपाखाली सात जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी आयएस चंपावत आणि त्यांच्या पथकाने रविवारी संध्याकाळीच सातही आरोपींना अटक केली होती. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या मुलाने जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता, त्यानंतर बीएसएफ जवान त्याच्या कुटुंबीयांसह मुलाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी गेला होता. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

आरोपी मुलगा ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेतील मुलगी ही विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा आहे, मात्र मुलाने मुलीचा अश्लील व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता. यानंतर बीएसएफ जवान त्याच्या कुटुंबीयांसह मुलाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी गेला. तेथे मुलाच्या कुटुंबीयांनी जवानावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली.