
कोकणात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. सिंधुदुर्गाला कोकणातील जैवविविधता भांडार म्हणून ओळखले जाते. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यामध्ये सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. याच तिलारीच्या खोऱ्यात विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आहेत. नाकाड्या चापडा (Hump Nosed Pit Viper) या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची तिलारी मधील केर-भेकुर्ली भागात सिंधुदुर्गातील पहिलीच नोंद झाली आहे.
Hump Nosed Pit Viper अर्थात नाकाड्या चापडा विषारी सापांमधील जगभरात प्रसिद्ध असलेल्या वर्गातील व्हायपर सापांचा अत्यंत दुर्मीळ साप केर-भेकुर्ली येथे दिसून आला. दक्षिण-पश्चिम भारत आणि श्रीलंका येथील स्थानिक प्रजाती आहे. या सापांचे लांबलचक सुळेदात भक्ष्याच्या शरीरामध्ये खोलवर दंश करून आतपर्यंत विष सोडतात. हे विष सहसा रक्तभिसरण संस्था आणि स्नायुंवर परिणाम करतात.
या सापांचे शरीर जाडसर असते, लांबी सहसा कमी असून डोके काहीसे चपटे आणि त्रिकोणी असते. या सापांमध्ये सापांच्या तोंडावर असणारी दोन उष्णता संवेदनाग्रहण करणारी छिद्रे आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताचे सस्तन प्राणी, पक्ष्यांची हालचाल सहज टिपू शकतात. या सापांच्या शरीरावर गडद तपकीरी किंवा राखाडी रंगाचे त्रिकोणी आकाराचे डाग असतात. हा साप इतर पिट व्हायपर सारखा हा झाडावर न राहाता खाली जमिनीवरच आढळतो. पालापाचोळ्यामध्ये झाडांच्या मुळांजवळ, दगडांखाली साप दिसून येतो.
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook