
औरंगाबाद शहरात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमध्ये धावत्या स्मार्ट सिटी बसला अचानक आग लागली. यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. ही बस करमाडवरून औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावर बस जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये दहा ते बारा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
Aurangabad | सिटी बसला भीषण आग pic.twitter.com/cos7OGzhNX
— Inside Marathi (@InsideMarathi) September 18, 2022