
बरेच व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात पसंत केले जातात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे . खूप लोकांकडून व्हिडीओ पहिला जात आहे आणि खूप शेअर केला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सोशल मीडियावर शिंगे असलेल्या सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोबत शिंग असलेला सापचा उल्लेख धर्म ग्रंथात आढळतो असेही मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कपाशीच्या शेतात एक साप जाताना दिसतो आणि त्याला शिंग असल्याचं सांगण्यात येत आहे.
#NationalGeographic horn snake pic.twitter.com/m3lOD0Gz8p
— Mitulg881 (@mitulg881) September 13, 2022
सोशल मीडियात सध्या अनेक तर्कवितर्क या सापाबाबत लावले जात आहेत. मात्र याबाबत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सापाला शिंग असल्याच्या चर्चेत तथ्य आढळलं नाही. त्या सापाने बेडकाची शिकार केली आहे, त्या बेडकाला तोंडाच्या बाजूने सापाने कंबरेपर्यंत गिळलंय. मात्र या बेडकाचे पाय सापाच्या तोंडाबाहेर आहेत त्यामुळे तो साप तसा दिसतोय. व्हिडिओत सापाला शिंग आल्याचं दिसत आहे.