दिल्ली पुन्हा हादरली! श्रद्धासारखी पुन्हा एक हत्या, उड्डाणपुलाखाली विखुरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

0
WhatsApp Group

दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह इकडे तिकडे विखुरलेला होता. बुधवारी सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा या घटनेने गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. सध्या दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9.15 वाजता गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ काही मानवी अवयव पडून असल्याची माहिती त्यांना मिळाली. मृतदेहाचे तुकडे करून अनेक ठिकाणी विखुरलेले होते. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

गेल्या वर्षी 27 वर्षीय श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीतील मेहरौली भागात गळा दाबून खून केला होता आणि त्यानंतर मृतदेहाचे 30 तुकडे करून इकडे-तिकडे जंगलात फेकून दिले होते.

दिल्लीत गेल्या काही महिन्यांत हत्या आणि मृतदेहाचे तुकडे करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यातही असेच एक प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पोलिसांना सफदरजंग हॉस्पिटलच्या मागे जंगलात एक कुजलेला मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र, हा मृतदेह महिलेचा होता की पुरुषाचा, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी 174 CrPC अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मृतदेह सुमारे 15 दिवसांचा असल्याचे सांगण्यात आले.