गोंदिया – अवघ्या 100 रुपयांसाठी मित्राची हत्या करणाऱ्या एका मित्राला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. विजय सहारे याने आपल्या मित्राचा अवघ्या 100 रुपयांच्या वादातून हत्या केली आहे.
चिराग शेंडे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या खळबळजनक हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, अशी माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी मृत चिरागने आरोपी असलेल्या आपला मित्र विजयला 500 रुपये व्याजाने दिले होते. विजयने व्याजासहीत झालेले 560 रुपये चिरागला परतही केले, मात्र अजून 100 रुपये देणे असल्याचे चिरागने विजयला सांगीतले आणि तो ते 100 रूपयांची वारंवार मागणी करायला लागला.
या कारणामुळेंच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या 100 रुपयांच्या वादातून झालेल्या या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!
आमच्या फेसबुक पेजला लाईक करा – https://www.facebook.com/insidemarathi