देशाची राजधानी दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे जाखिरा उड्डाणपुलाजवळ मालगाडी उलटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे 10 डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे, अग्निशमन दल आणि इतर मदत व बचाव पथके अपघातस्थळी पोहोचली. रेल्वेने सांगितले की, मालगाडीत लोखंडी पत्र्याचे रोल्स भरले होते. पटेल नगर-दयाबस्ती विभागाच्या मध्यभागी हा अपघात झाला. ही ट्रेन मुंबईहून चंदीगडला जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.52 वाजता बीएचपीएल सीडीजी लोड नावाच्या मालगाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. मालगाडीची बोगी रुळावरून घसरताच मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणारे लोक तेथे जमले. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विभागातील पटेल नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत.
#WATCH | Eight wagons of a goods train derail on Patel Nagar-Dayabasti section in Delhi area. The incident occurred near the Zakhira flyover.
(Video source: Delhi Police) pic.twitter.com/cQieCNsQAV
— ANI (@ANI) February 17, 2024