
Mumbai Building Collapsed : मुंबई-बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत दुर्घटना घडली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. ही इमारत धोकादायक असल्याचे मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ही इमारत 30 ते 35 वर्षे जुनी होती. पालिकेकडून इमारतीतील सर्वांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यापैकी एक पंजाबी कुटुंब इमारत कोसळली तेव्हा इमारतीत उपस्थित होतं. याच कुटुंबातील 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरु#Mumbai pic.twitter.com/bj5s1jsehq
— Inside Marathi (@InsideMarathi) August 19, 2022
इमारत कोसळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्त्यासारखी ही इमारत अगदी क्षणार्धात जमिनदोस्त झाली. सध्या बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली एका कुटुंबातील 5 ते 6 जण अडकल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.