नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

WhatsApp Group

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गावातील शिवाजी नगर परिसरामध्ये चार माळ्याची इमारत कोसळली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि.02) सकाळी त्याची बॉडी ढिगाऱ्याखाली मिळाली सदर इमारत धोकादायक होती. मात्र तरीही या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कोपरखैरणे, बेलापूर आणि इतर ठिकाणच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान रात्री शोधाशोध करताना काहीही सापडले नव्हते दरम्यान सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यावर आज सकाळी एका 28 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. आता इमारतीचा ढिगार बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा