
पुण्यातील लुल्ला नगर भागातील एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. लवकरच आग आटोक्यात आणली जाईल.
दरम्यान, सोमवारी मुंबईतील झोपडपट्टीबहुल धारावी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या पोलिस बसला आग लागली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायन-वांद्रे लिंक रोडवर उभ्या असलेल्या पोलिस बसच्या केबिनमध्ये आग लागली आणि दुपारी दीडच्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग लवकरच आटोक्यात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. “बस रिकामी असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही,” असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Big fire in #Pune hotel. pic.twitter.com/5z3nN4Itat
— Vivek Gupta (@imvivekgupta) November 1, 2022
याशिवाय दिवाळीत पुण्यातून किमान 15 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका घटनेत फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात पुण्यातील औंध परिसरात असलेल्या एका घराला भीषण आग लागली होती. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत पुण्यातील विविध भागात किमान 15 फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.