रोहित शर्माच्या पाया पडायला चाहता मैदानात आला अन्… त्यानंतर काय घडलं Video मध्ये पाहा

0
WhatsApp Group

India vs England 1st Test: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांवर सर्वबाद झाला होता. सामन्यादरम्यान पहिल्या डावात भारतीय फलंदाजीची सलामी देण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी धमाका केला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी क्रिजवर येताच त्याचा एक चाहता मैदानात आला. हा चाहता थेट रोहित शर्माजवळ धावत आला आणि त्याच्या पायाला स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला

हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांत गडगडला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 37 धावांची आणि बेन डकेटने 35 धावांची खेळी खेळली. भारतीय फिरकीपटूंची जादू पहिल्या डावात पाहायला मिळाली. भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3 बळी घेतले. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी 2-2 बळी घेतले. सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या सलामीवीरांकडून चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली.

यानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीसाठी फिरकी गोलंदाजांचा वापर केल्याने इंग्लंडचा डाव ढासळू लागला. जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी काही काळ डाव सांभाळला असला तरी हे दोन फलंदाजही भारतीय फिरकीपटूंचा फार काळ सामना करू शकले नाहीत.