
भारताचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो दररोज आपल्या मजेशीर ट्विटमुळे चर्चेत असतो. दरम्यान एक मजेशीर घटना समोर आली आहे. ट्विटरवर एका युजरने भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्राला त्याच्या मैत्रिणीला डेटवर नेण्यासाठी 300 रुपये मागितले. यानंतर त्या यूजरला अमित मिश्राकडून रिप्लाय येईल अशी अपेक्षाही नव्हती मात्र अमित मिश्राने त्याला रिप्लाय दिला.
Sir 300 rs gpay karodo gf ko ghumne leke Jana h
— MSDIAN adi (@AdityaK61351639) September 29, 2022
अमित मिश्राने गुरुवारी सुरेश रैनाचा व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यामध्ये त्याने रैनाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. त्याच्या कमेंटमध्ये आदित्य कुमार सिंह नावाच्या युजरने लिहिले – सर, 300 रुपये द्या. मैत्रिणीला फिरायला घेऊन जायचे आहे. अमित मिश्राने त्यानंतंर त्या युझरला 500 रूपये ट्रान्सफर केले. अमितने याचा स्क्रीन शॉट शेअर करताना लिहिले, डन, डेटसाठी ऑल दी बेस्ट. त्यानंतर त्या युझरने अमित मिश्राला धन्यवादही म्हटले.
अमित मिश्राने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 T20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 22 कसोटीमध्ये 76 विकेट, एकदिवसीयमध्ये 64 विकेट आणि T20 आंतरराष्ट्रीयमध्ये 16 विकेट आहेत. याशिवाय अमितने 154 आयपीएल सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 7.35 च्या इकॉनॉमी आणि 19.55 च्या स्ट्राईक रेटने 166 विकेट घेतल्या आहेत. 17 धावांत पाच बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा