टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, 41 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

WhatsApp Group

Subi Suresh Death: मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश हिचे बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी समोर आल्यापासून तिचे चाहते आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

वृत्तानुसार, सुबी दीर्घकाळापासून यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होती. तिच्यावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सुबी ही मल्याळम चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचा एक अतिशय प्रसिद्ध चेहरा होता, जीने अनेक टीव्ही शो होस्ट केले आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

सुबी सुरेश हिने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘सिनेमाला’ या कॉमेडी शोमधून तिला लोकांचे खूप प्रेम मिळाले. तिने अनेक टीव्ही शोमध्ये विविध भूमिका साकारल्या, ज्यांनी लोकांची मने जिंकली. ‘कुट्टी पट्टलम’ या मुलांच्या शोमध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती. यासोबतच ती ‘हॅपी हसबंड्स’ आणि ‘कंकणसिंहासनम’ यांसारख्या चित्रपटातील तिच्या कॉमेडीमुळेही चर्चेत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subi Suresh (@subisuresh_official)

मिळालेल्या माहितीनुसार, सुबी सुरेशचे वडील दुकान चालवतात आणि आई गृहिणी आहे. सुबी सुरेशचे लग्न झाले नव्हते, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीही बोलत नसे. 2018 मध्ये, तिने ‘लेबर रूम’ या शोद्वारे मल्याळम टीव्हीवर पुनरागमन केले.