एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

WhatsApp Group

मुंबई: एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, एक्सॉन मोबीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मॉन्टे डॉ.बसन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. राज्यात उद्योग वाढीस पोषक वातावरण आहे. ऊर्जा विकास क्षेत्रात सहकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक्सॉन मोबीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मॉन्टे डॉ.बसन,म्हणाले, जागतिक समृद्धीसाठी परवडणारे आणि शाश्वत ऊर्जा पर्याय आवश्यक आहेत. विविध क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संधी दिसत आहेत. भारतात उद्योग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद असून आगामी गुंतवणुकीद्वारे रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असेही डॉ. डॉबसन यांनी सांगितले.

कंपनीचे अत्याधुनिक ल्युब्रिकंटस उत्पादन देशातील ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.