IND W vs AUS W: वानखेडेवर टीम इंडियाचा दारूण पराभव, ऑस्ट्रेलियाने 3-0 ने जिंकली मालिका

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने झाली, ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली. पण भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा 3-0 ने पराभव केला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 190 धावांनी विजय मिळवला.

फॉर्मात असलेल्या फोबी लिचफिल्डचे शतक आणि कर्णधार अॅलिसा हिलीसोबत पहिल्या विकेटसाठी तिची मोठी शतकी भागीदारी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 338 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ 32.4 षटकांत 148 धावांवर बाद झाला.

फोबी लिचफिल्डची शानदार खेळी 

लिचफिल्डने 125 चेंडूंत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 119 धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर हीलीने 85 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह 82 धावांची खेळी केली. या दोघांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सिद्ध केला आणि पहिल्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. तर भारताकडून सलामीवीर स्मृती मानधना हिने सर्वाधिक २९ धावा केल्या. याआधी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. त्याचवेळी दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला अवघ्या 3 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.