Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसला पाठिमागून कंटेनरची धडक

WhatsApp Group

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी बसला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या मागील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा