Video: नालंदामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका, 5 तास चालले बचावकार्य

WhatsApp Group

नालंदा : बिहारमधील नालंदा येथील कुल गावात एक मूल बोअरवेलमध्ये पडल्याने खळबळ उडाली होती. मुलाला वाचवण्यासाठी अनेक तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले आणि अखेर त्या बालक शिवमला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. बिहारच्या नालंदा जिल्ह्याचे एनडीआरएफ अधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले की, त्याला वाचवण्यासाठी आम्हाला सुमारे 5 तास लागले. मूल ठीक असून त्याला वाचवण्यात आले आहे. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.