समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

WhatsApp Group

ठाणे – एनसीबीचे former NCB officer माजी अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. शनिवारी रात्री कोपरी पोलीस ठाण्यामध्ये Kopari police station समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला आहे असा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द करण्यात आला होता. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांच्याकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलिस ठाण्यामध्ये कलम 420 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.