मोठी बातमी! रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

WhatsApp Group

पुणे – भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं  पाहायला मिळालं. इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने स्मृती इराणींविरोधात आंदोलन छेडल्यानंतर भाजप (BJP) व राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आमने-सामने आले.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणींविरोधात घोषणाबाजी करत JW Marriot हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंसह (Rupali Patil Thombare) 30-40 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.

रूपाली पाटील ठोंबरेंसह राष्ट्रवादीच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इरांणींविरोधात आंदोलन करणं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. रूपाली ठोंबरे यांच्यासह निलेश निकम, महेश हांडे, उदय महालेंसह इतर अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.