मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

WhatsApp Group

पुणे – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनात Band Garden Police Station Pune हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्या प्रकरणी Phone tapping case न्यायालयामध्ये वाद सुरू असतानाच आता पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदी कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.फोन टॅपिंग प्रकरणामध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात घेतली होती धाव

फोन टॅपिंग प्रकरणात मागे दोन वेळा सायबरकडून चौकशीला हजर राहण्या संदर्भात समन्स रश्मी शुक्ला यांना बजावण्यात आले आहेत. पण, दोन्ही वेळा कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी टाळाटाळ केली होती. एवढेच नव्हेतर ईमेल द्वारे प्रश्न पाठवावे, त्याची उत्तरे देते, अशी मागणी देखील शुक्ला यांनी केली होती.