मुंबई – दिशा सालियन प्रकरणामध्ये गंभीर आणि खळबळजनक आरोप करणे केंद्रीय नारायण राणे यांना भोवल्याचे दिसत आहे. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दिल्यानंतर महिला आयोगाने देखील चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. अखेर आज मालवणी पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले होते. त्याबरोबर याच प्रकरणातून सुशांत सिंग राजपूतचीही हत्या करण्यात आली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.