जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये एक प्रवासी वाहन खोल दरीमध्ये कोसळून नऊ जण ठार तर चार जखमी झाले आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभातून परतत होते. गुरुवारी संध्याकाळी सुरनकोटच्या तारारवली बुफलियाज भागामध्ये वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कार मुर्राह गावामधून येत होती आणि ते सुरनकोटच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात घडला.
स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस आणि लष्कराने तातडीने बचावकार्य करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयामध्ये नेत असताना मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुंछमध्ये झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे. जखमींवर शक्य ते सर्व उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook