
बुलडाणा – साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळाने घाला घातलाय. मारुती सुझुकी अल्टो कार आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उडाला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मेहकर आणि डोणगाव रोडवर हा अपघात झाला. दरम्यान, अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण चाळीसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. हे लोक साखपुड्यासाठी दिगरसाल येथे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे.
दरम्यान, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्याचा प्रश्न वेळोवेळी निर्माण झाला आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही संसदेमध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या ही चिंतेची बाब असल्याच सांगितलं होतं. दरम्यान, बुलडाणा येथे पुन्हा एकदा राज्यातील रस्त्यांची दुरवस्था थांबण्याचे नाव घेत नाहीये.