Vadodara Bus Accident: वडोदरा येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक, 4 ठार, 19 जखमी

WhatsApp Group

Vadodara Bus Accident: गुजरातमधील वडोदरा येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथील कपूराई पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 वर एका लक्झरी बसने ट्रकला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बस महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून धडकली. या अपघातात चालक आणि तीन प्रवाशांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर 19 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हेही वाचा – विश्वचषकानंतर ‘हे’ 3 भारतीय दिग्गज T20 फॉरमॅट खेळणार नाहीत! पहा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश? 

ही बस अहमदाबादहून सुरतला जात होती. यादरम्यान हा अपघात झाला. सध्या शहर वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चालक ट्रकसह फरार झाला आहे.